कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात करण्यात येत असलेल्या नवीन रस्त्यांच्या कामाची व पॅचवर्कच्या कामांची अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शनिवारी पाहणी केली.

यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासमवेत एसटी स्टँड दाभोळकर कॉर्नर, भू विकास बँक, वटेश्वर मंदिर परिसरातील पॅचवर्कच्या व अनंतपुरम येथे ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या नवीन रस्त्याच्या कामाची पाहणी केली.  विभागीय कार्यालय क्र. १ अंतर्गत रिंग रोड, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, हॉकी स्टेडियम ते निर्माण चौक या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले. अहिल्याबाई होळकर स्मारक ते क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, डायना कॅसेल रिंगरोड याठिकाणी ठेकेदारामार्फत अंतर्गत रस्ते करण्यात येत आहेत. विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत शाहू मैदान, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, पंचांगा घाट व शिंगणापूर पाणंद रोड या परिसरात महापालिकेच्या वतीने पॅचवर्क करण्यात आले.