Breaking News

 

 

कोयनेचे पाणी कर्नाटकाला देऊ नका : आ. शंभूराज देसाई

मुंबई (प्रतिनिधी) : कोयना नदीचे पाणी कर्नाटकाला न देता ते राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केला आहे.

या मागणीच्या पत्रात म्हटले आहे की, कर्नाटकाला आतापर्यंत देण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी देण्यात येऊ नये. तसेच अद्याप राज्यात मॉन्सूनच्या आगमनाला महिन्याभराचा अवधी आहे. त्यामुळे हा पावळ्यापर्यंत पुरेल का नाही याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असून या तालुक्यात पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केले आहे.

कोयना धरणात जून अखेरीस पाण्याची आकडेवारी पाहता पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी पाठबंधारे विभागाला कसरत करावी लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, तसेच राज्यातील पाण्याची गंभीर स्थिती पाहता हे पाणी राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

255 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा