स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंग – वन प्लस यांच्यात चडाओड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारपेठेतील प्रथम क्रमांकसाठी दक्षिण कोरियाची सॅमसंग आणि चीनची वन प्लस यांच्यात स्पर्धा चालू झाली आहे. तीस हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या मोबाईल विक्रीत विवो, ओप्पो आणि हुवाई यांसारख्या कंपन्या आहेत. मात्र, थेट स्पर्धा या दोन कंपन्यांमध्ये आहे. गुगलही या स्पर्धेत उतरले असून अॅपलने ही किंमतीत घट केली आहे. त्यामुळे या स्पर्धेची तीव्र अधिक वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सॅमसंगच्या एस १० सीरिजमधील एस १० ई, एस १० आमि एस १० प्लस या मोबाईलची बाजारपेठेतील कामगिरी चांगली आहे. याच्या जोरावर जानेवारी ते मार्च या तिमाहीत वन प्लसचे पहिले स्थान हिसकावून घेतले होते. आता वन प्लस ७ हा नवा मोबाईल लाँच करत असून सॅमसंगच्या वर्चस्वाला वन प्लस धक्का देऊ शकतो. 

काउंटरपॉईंट रिसर्चचे सहसंचालक तरुण पाठक यांनी सांगितले की, वन प्लस आपले दोन मोबाईल लाँच करत आहे. त्यामुळे  वन प्लस सॅमसंगला धक्का देऊ शकते. वन प्लस पहिल्यांदा ग्राहकांना अपग्रेड करण्यासाठी दोन स्मार्टफोनचा पर्याय देत आहे. मोबाईलची किंमत किती असेल यावर सगळी गणिते असतील असेही त्यांनी सांगितले. वन प्लस ७ प्रोची किंमत ५७ हजार रुपये असू शकते अशी चर्चा सुरू आहे.

360 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram