Breaking News

 

 

‘विहिंप’तर्फे लेह येथे २३ जूनपासून सिंधू दर्शन महोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषदेच्यावतीने लेह (लडाख) येथे सिंधु दर्शन उत्सवाचे आयोजन दि.२३ ते २६ जून या कालावधीत करण्यात आले आहे. या उत्सवासाठी यात्रेला जाण्याचे नियोजन करणेत येत आहे. या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ता. १८ जून रोजी जम्मू किंवा चंदीगड येथे एकत्र यायचे आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वि.ही.प.शहराध्यक्ष अशोक रामचंदानी व शहर सहमंत्री अॅड. सुधीर जोशी (वंदूरकर) यांनी आजच्या (बुधवार) पत्रकार परिषदेत केले आहे.

त्यांनी सांगितले की, या यात्रेत हिमालयीन क्षेत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. लेह (लडाख) व सिंधु नदीचा परिसर, भगवान गौतमबुध्द, गुरुनानक, भगवान झुलेलाल या संतांच्या कर्मभूमीला भेट देता येणार आहे. यातून हिंदू संस्कृतीच्या उगम स्थान, भारतीय संस्कृती, सिंधु सभ्यतेचे दर्शन होणार आहे. याचबरोबर कारगील, द्रास, खारदुंगला व चांगलापास अशा अत्यंत दुर्गम क्षेत्राला भेट देता येणार आहे.

या यात्रेस जाण्यासाठी कोल्हापुरातील विश्व हिंदू परिषदेच्या कमलकुंज टिनी टॉवर, नागेशकर व्यायामशाळेसमोर, कलायोगी जी. कांबळे पथ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. यावेळी कैलास काइगडे, अनिल कोडोलीकर व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

270 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash