मारुती सुझुकी बाजारात आणणार सात आसनी कार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील अग्रगण्य कार कंपनी मारुती सुझुकी एक नवी कार आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या वॅगन आर या कारवर आधारित ही कार असणार आहे. पुढील महिन्यात कंपनीकडून ही नवीन सात आसनी कार लाँच केली जाणार असून ही कार एमपीव्ही (मल्टीपर्पज व्हेईकल)  प्रकारातील असेल.

कंपनीला ही कार प्रीमियम ऑफर म्हणून बाजारात उतरवण्याची इच्छा आहे. भारतीय बाजारात या सात आसनी कारची स्पर्धा दस्तून गो प्लस आणि रेनॉची नवीन कार ‘ट्राइबर’सह होऊ शकते. मारुती सुझुकीच्या सात आसनी एमपीव्हीमध्ये १.२ लिटर, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. याच इंजिनाचा वापर कंपनीकडून वॅगन आर हॅचबॅक मध्ये करण्यात आला आहे. हे इंजिन ६००० आर. पी. एमवर ८२ बीएचपी पॉवर आणि ४,२०० आर. पी. एमवर ११३ एनएम टॉर्क जनरेट करतं. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड एएमटी गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे.

या सात आसनी कारचं नाव ‘वॅगन आर’ असणार की अन्य काही, आणि या कारची किंमत किती असू शकते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

585 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram