कळे (प्रतिनिधी) : येथील सुप्रिया सरदार पाटील यांची शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत निवडीचे पत्र दिले. यासाठी शिवसेना पन्हाळा तालुकाप्रमुख सुरेश पोवार व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.