ऑंलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला स्थान द्या, अन्यथा… : ‘एआयबीए’चा इशारा

गोल्ड कोस्ट (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय ऑंलिम्पिक समितीच्या सूचनेनुसार बदल केलेले आहेत.  पण, जर टोकियोमध्ये होणाऱ्या २०२० ऑंलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वादात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) दिला आहे.

आयओसीने पुढील वर्षी होणाऱ्या ऑंलिम्पिकसाठी या खेळाची तयारी थांबविली होती. कारण २०१६ च्या रिओ ऑंलिम्पिकमध्ये बाऊट फिक्सिंगचे आरोप झाले होते. आयओएने एआयबीएकडे या आरोपावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्याचे पुरावे मागितले होते.
टोकियो २०२० मध्ये बॉक्सिंगच्या समावेशाबाबत २२ मे रोजी निर्णय होणार आहे. या स्पर्धेत बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर पुढील ऑंलिम्पिकमध्ये याचा समावेश असावा, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आयओसीने स्पष्ट केले.

एआयबीएने एएफपीला पाठविलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, ‘टोकियोमध्ये या खेळाच्या आयोजनासाठी खेळाचा बचाव करण्याच्या वैध अधिकाराचा वापर करू. आयओसीने ऑंलिम्पिक चार्टरचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व पर्यायांचा विचार केला जाईल. त्यात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचाही समावेश असल्याचे सांगितले.

177 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram