Breaking News

 

 

#metoo: करण ओबेरॉयला पूजा बेदीचा पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अभिनेता करण ओबेरॉयला पाठिंबा देण्यासाठी अनेक मित्रमंडळी पुढे आली आहे. यामध्ये  ९० च्या दशकातील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री पूजा बेदीनेही पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी करणच्या समर्थनार्थ त्याच्या बँड ऑफ बॉईज या टीममधील कलाकारांनी व मित्रांनी पूजा बेदी हीच्या घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी करण आपला जवळचा मित्र असून गेली २० वर्ष आमची मैत्री आहे. त्याचे वडील निवृत्त लष्कर अधिकारी असून कडक शिस्तीत वाढलेला करण असे कृत्य करुच शकत नाही असा दावा त्याच्या मैत्रिणी केला आहे.

अशा आरोपांमुळे पुरुषांचेही करिअर व प्रतिष्ठापणाला लागते. अनेकवेळा त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते असे सांगत पूजा बेदी हिने पुरुषांच्या हक्कासाठी लढण्याची ही वेळ आली असल्याचे म्हटले आहे. मीटूच्या चळवळीप्रमाणे ही मीटूची सुरुवात असल्याचेही पूजाने म्हटले आहे.

करणवर त्याच्या ज्योतिषी असलेल्या मैत्रिणीने बलात्कार व ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. माझा व्हिडीओ काढून करणने मला वारंवार ब्लॅकमेल केले असल्याचाही आरोप या महिलेने केला आहे.

492 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा