Breaking News

 

 

मिलिंद एकबोटे यांना बेदम मारहाण

पुणे (प्रतिनिधी) : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड येथील झेंडेवाडीमध्ये काल (मंगळवारी) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताहनिमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर लिहिली होती. या रागातून मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला.

मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

882 total views, 18 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा