Breaking News

 

 

निवडणुकीनंतर पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात होत असलेली वाढ, रुपयाची घसरण आणि इराणकडून कमी दरात होणारा इंधनपुरवठा या महिन्यात खंडित होणार आहे. त्यामुळे २० मेपासून पेट्रोल व डिझेल दरवाढ होण्याचे संकेत वर्तवली जात आहेत.

कच्च्या इंधनाचे दर वाढत असल्याने सरकारी इंधन कंपन्यांना आर्थिक झळ बसत आहे. मात्र लोकसभा निवडणूक सुरू असल्याने सरकारने पेट्रोल दरवाढ रोखून धरल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे भारताने इराणकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या इंधनाच्या आयातीत कपात केली आहे. एप्रिलमध्ये या आयातीचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी झाले. चालू महिन्यापासून इराणकडून केली जाणारी आयात पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. यामुळे भारताचा इंधनखर्च वाढणे जवळपास निश्चित असून देशांतर्गत पेट्रोल व डिझेलच्या दरांवर त्याचा विपरित परिणाम होण्याचे संकेत आहेत.

अमेरिकेने इराणवर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक निर्बंध लादले. यानंतर इराणकडून होणारी इंधनखरेदी सहा महिन्यांत टप्प्याटप्याने संपुष्टात आणण्याची सूचना अमेरिकेने भारत व चीनसह अनेक देशांना केली होती. ही मुदत एप्रिलमध्ये संपल्याने इराणकडून होणारी इंधन आयात आता बंद होण्याच्या स्थितीत आहे. भारताने एप्रिलमध्ये इराणकडून दररोज सरासरी २,७७,६०० बॅरल कच्चे इंधन आयात केले.


366 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा