Breaking News

 

 

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील चकमकीत दोन नक्षलींचा खात्मा

रायपूर (प्रतिनिधी) : छत्तीसगडमधील दंतेवाडा भागात आज (बुधवार) दोन नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गुंडेरस जंगलात ही कारवाई केली आहे.

अरणपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात आज पहाटे ५ वाजता सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली होती. नक्षलींच्या गोळीबारास चोख प्रत्युत्तर देत जवानांनी दोघांना कंठस्नान घातले. या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या मृतदेहाच्या ठिकाणाहून एक रायफल, १२ बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

सुरक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. या कारवाईनंतर आसपासच्या परिसरातही जवानांची शोध मोहिम सुरू आहे. दंतेवाडात कार्यरत असलेल्या डीआरजीच्या एकमेव महिलांच्या तुकडीत ३० आत्मसमर्पण केलेल्या नक्षली महिला व शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्नींचा समावेश करण्यात आलेला आहे.

201 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे