Breaking News

 

 

लाहोर बॉम्बस्फोटाने हादरले : आठ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू ; २५ जखमी

लाहोर (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातील लाहोर शहरात आज (बुधवार) सकाळीच्या दरम्यान बॉम्बस्फोट झाल्याने हादरले आहे. लाहोरमधील सूफी दर्ग्याजवळ हा स्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात आठ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

११ व्या शतकातील दाता दरबार दर्ग्यात महिलांच्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला. दक्षिण आशियातील हा सर्वात मोठा सूफी दर्गा आहे. याआधी २०१० साली या दर्ग्याला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ४० लोकांचा मृत्यू झाला होता.

सध्या या दर्ग्याजवळ मोठा प्रमाणात बंदोबस्त वाढवला असूनही हा स्फोट घडला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करण्याच्या हेतूने हा आत्मघातकी हल्ला घडवण्यात आला असावा असा अंदाज स्थानिक पोलीस अधिकारी काशिफ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

474 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा