Breaking News

 

 

पक्षविरोधी कारस्थाने : काँग्रेसच्या पाच आमदारांवर होणार कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, नितेश राणे, कालिदास कोळंबकर या आमदारांचा समावेश आहे. त्यांच्यावर १० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होती. तरीपण काँग्रेसच्या आमदारांनी जाहीरपणे युतीच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली होती. तसेच अनेक ठिकाणी पक्षाविरूद्ध काम केले आणि विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील हेमुलगा सुजय याला अहमदनगरमधून उमेदवारी न दिल्याने नाराज होते. राष्ट्रवादीने सुजय विखे यांच्यासाठी जागा सोडली नाही. त्यामुळे विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार होता. पण नितेश राणे यांनी आपले बंधू आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी काम केले. औरंगाबादमध्ये काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधातच प्रचार केला.

सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत केली.  वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पक्षात जाईन, अशी घोषणा वडाळा मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार त्यांनी प्रचार केला.

372 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे