Breaking News

 

 

आदमापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध !

गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथील कै. गणपतराव डोंगळे सांस्कृतिक ट्रस्ट, बाळूमामा देवालय व बाळूमामा फौंडेशनच्या वतीने आदमापूर येथे सद्गुरु बाळूमामा देवालयात आज (मंगळवार) आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध झाली. आज दु.३ वा. ४५ मिनिटांनी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुणकुमार  डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील नऊ वर्षे डोंगळे परिवाराकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

या सामुदायिक विवाह  सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना लग्नाचा पेहराव व संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली. शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शेतकरी वधूपित्यास १० हजार रुपये व मागासवर्गीय वधूपित्यास २० हजार रुपये  अनुदान ट्रस्टमार्फत मिळवून देणेत येणार आहे. विवाह सोहळ्यासाठी अक्षता, भटजी, वधूवरांसाठी हार-तुरे तसेच व-हाडी मंडळींना भोजन आदींची व्यवस्था ट्रस्ट व देवालय समिती मार्फत करणेत आली होती.

वधू-वरांना शुभाशीर्वाद देणेसाठी  बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, फौंडेशनचे अध्यक्ष विजयराव गुरव, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे,  माजी अध्यक्ष  विश्वास पाटील, रविंद्र आपटे, संचालक पी.डी.धुंदरे, कृष्णराव किरुळकर,  विजयसिंह मोरे, अर्जून  आबीटकर, नाथाजी  पाटील, राहूल देसाई, सुरेश नाईक, एकनाथ पाटील, विठ्ठलराव खोराटे, उत्तम पाटील, बी. आर. पाटील, संजयसिंह पाटील, उदयसिंह पाटील, धीरज डोंगळे, विजयसिंह डोंगळे, पांडुरंग भांदिगरे आदीसह मान्यवर व  वधूवरांचे नातेवाईक, पै-पाहुणे उपस्थित होते.   

अपंग जोडपे विवाहबद्ध

या सोहळ्याचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कृष्णा (रा. ऐजिवडे) व नूतन (रा. भिरवंडे) या अपंग वधूवरांचा विवाह सोहळा पार पडला.  त्यांना गोकुळचे संचालक अरूणकुमार डोंगळे, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी शुभाशीर्वाद दिला.

921 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे