Breaking News

 

 

मोदी म्हणजे दुर्योधन : प्रियांका गांधी

अंबाला (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ असा उल्लेख केल्याने उठलेले वादळ उद्याप शांत झालेले आहे. आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या वादात उडी घेत पंतप्रधान मोदींची तुलना थेट दुर्योधनाशी केली आहे. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे २३ मे रोजी कळेल, असे प्रयुत्तर दिले आहे.

हरयाणातील अंबाला येथे प्रचारसभेत प्रियांका यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार शब्दांत निशाणा साधला. ‘गेल्या निवडणुकीत आपण कोणती आश्वासनं दिली होती? ती आश्वासनं पूर्ण केलीत की नाहीत?, यावर काहीच न बोलता भाजपचे नेते शहिदांच्या नावाने मते मागत आहेत’, असा आरोप प्रियांका यांनी केला. भाजपने माझ्या कुटुंबातील सदस्याचा, माझ्या वडिलांचा अपमान केला आहे. महत्त्वाचे मुद्दे सोडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र अशा अहंकारी व्यक्तीला देश माफ करणार नाही. हा अहंकार गळून पडेल, असे नमूद करत प्रियांका यांनी महाभारतातील दाखला दिला.

श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाला समजावण्यासाठी गेले तेव्हा दुर्योधनाने त्यांनाच कैद करण्याचा प्रयत्न केला होता, याकडे प्रियांका यांनी लक्ष वेधले. ही निवडणूक कोण्या एका घराण्याची नसून ज्या कुटुंबांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा झाला आहे त्या सर्वांचीच ही निवडणूक असल्याचेही प्रियांका पुढे म्हणाल्या.  प्रियांका गांधी यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केल्यानंतर भाजपकडूनही प्रियांका यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण, याचा फैसला २३ मे रोजी (निकालादिवशी) होईल, असे भाजपाध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमधील सभेत म्हणाले. 

321 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश