Breaking News

 

 

लोकसभा निवडणूक निकालाबाबत सट्टेबाजांचा वेगळाच अंदाज !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकांचे आतापर्यंत पाच टप्पे पार पडले आहेत. सहाव्या टप्प्यात १२ मे रोजी तर सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडणार असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालावर सुमारे १२ हजार कोटींचा सट्टा लागला आहे. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार, कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ लढत आहे. या दोन पक्षांशिवाय तिसऱ्याच महागठबंधनला चांगल्या जागा मिळतील. या स्थितीत त्रिशंकू स्थितीही होऊ शकते. 

भाजपच्या नेतृत्वाखाली देशात एनडीए सरकार सत्तेत येऊ शकतं, असा एक अंदाज वर्तवला जात आहे. एनडीएला १८५ ते २२० जागा मिळतील तर यूपीएला १६० ते १८० जागा मिळतील, असं भाकित वर्तवण्यात येत आहे. भाजपला या निवडणुकीत एअर स्ट्राइकचा फारसा फायदा मिळणार नाही, असाही सट्टेवाल्यांचा अंदाज आहे. या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक, राष्ट्रवाद, न्याय, राफेल हे सगळे मुद्दे गाजले. आता शेवटच्या दोन टप्प्यांत ११८ जागांचं मतदान बाकी आहे तर ४२५ जागांवरचं मतदान पूर्ण झालं आहे. 

एनडीए आणि यूपीएच्या तुलनेत महागठबंधन म्हणजेच तिसऱ्या आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असं सट्टेवाल्यांना वाटतं. या तिसऱ्या आघाडीच्या जागा निर्णायक ठरतील. त्यामुळेच आत्ताच्या घडीला नेमकं सरकार कुणाचं येणार हे सांगता येत नाही, अशीच स्थिती आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी अशा नेत्यांचा समावेश आहे. त्रिशंकू लोकसभेच्या अंदाजामुळे याही पक्षांच्या हालचाली जोरात सुरू आहेत.

504 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे