Breaking News

 

 

लाईव्ह मराठी इम्पॅॅक्ट : कोलीक येथील छ. शाहू पुतळा परिसराची स्वच्छता…

बाजारभोगाव (प्रतिनिधी) : कोलीक (ता. पन्हाळा) येथे छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे, मात्र या पुतळा परिसर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्यावर ‘लाईव्ह मराठी’ने वृत्तातून आवाज उठवला होता. अर्थशास्त्राचे अभ्यासक व बालकल्याण समितीचे न्यायाधीश प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन याविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर काल (सोमवार)  जे. के. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराची स्वच्छता झाली. या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल ‘लाईव्ह मराठी’चे शाहूप्रेमींतून अभिनंदन होत आहे.

सोमवारी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ठीक ८ वाजता कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पुतळा परिसराची स्वच्छता झाली आणि परिसर सुंदर झाला. डॉ. जे. के. पवार यांनी पुढील चार दिवसात कामाची कार्यवाही करून पुतळ्याला संरक्षण कठडा, छत्र व बगीचा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी प्रा.डॉ.एम.के.कांबळे, दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील, एकनाथ पाटील, जिजू दशवंत, बाळू लांबोरे, रघुनाथ पाटील, काळजवडेचे सरपंच शामराव पाटील, पिसात्रीचे  सरपंच तानाजी शिंदे, उपसरपंच संजय पाटील, केरबा आरडे, पाटील, शंकर पोवार यांच्यासह कोलिक, चाफेवाडी तसेच पंचक्रोशितील शाहूप्रेमी उपस्थित होते. त्याचबरोबर शाहू महाराजांचे विचार व शाहूंची अर्थनीती ही पुस्तके देऊन मान्यवरांना गौरविण्यात आले

588 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *