Breaking News

 

 

राज्यात उष्माघाताने सात जणांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उष्माघाताने सात जणांचा मृत्यू झाला असून  ३०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. उष्माघाताने हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर बीड, धुळे आणि परभणीत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च ते ५ मे या दरम्यान या सात रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर राज्यात ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. सर्वाधिक रुग्ण अकोल्यात असून त्यांची संख्या १३८ आहे. तर नागपूरमध्ये ११२, लातूर जिल्ह्यात ४१, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकी ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या परभणी आणि जालन्यात ४२ अंशावर तापमान पोहोचले आहे. तर गेल्या महिन्यात विदर्भात तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचले होते. पुढील काही दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

159 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे