Breaking News

 

 

फुलांपासून बनवा असा तेजस्वी चेहरा

फुलांचा वापर केवळ सजावटीसाठीच करण्यात येत नाही, तर त्यांचा वापर सौंदर्य खुलविण्यासाठी देखील करता येतो. सौंदर्य खुलविण्यासाठी अलीकडच्या काळात ‘फ्लावर फेशियल’ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये कोणकोणते फायदे होतील हे पुढे पाहता येणार आहे.

फुलांचा फेशियल फ्लोरल ऑइल, फुलांच्या रसापासून बनवला जातो. यामध्ये फुलांना यंत्राच्या सहाय्याने बारीक करून पेस्ट बनवले जाते. त्यानंतर त्यांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचे तेज वाढते. हे फेशियल पूर्णपणे हर्बल व नैसर्गिक असल्याने त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्वचेला सुंदर बनविण्यासोबतच गोरेपणा, निखार, त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्याचे काम या विशेष फेशियलमधून केले जाते. उन्हामुळे पडणारे काळे डाग या पेस्टमुळे कमी होतात.

फ्लोरल किंवा फ्लावर फेशियल करण्यापूर्वी त्वचेची चाचपणी करणे गरजेचे आहे.  ज्या प्रकाराची त्वचा आहे, त्या प्रकारचे फेशियल करायला हवे. तुमच्या त्वचेवर मुरूम, तारूण्यपिटिका डाग असतील तर गुलाब, रजनीगंधा, कारनेशन, गुलदावरी, जरबेरा, लिली, सूर्यफुल, चायनीज हीबिस्कस, मेरीगोल्ड यापैकी एखाद्या कोणत्याही फुलाची पेस्ट लावल्यास चेहऱ्यावर चांगला परिणाम जाणवेल. ही पेस्ट आपण कधीही बनवू शकता.
आपल्या चेहऱ्यावर जास्त डाग असल्यास गुलाब फेशियल सर्वोत्तम पर्याय ठरेल. त्वचेला ताण देण्याचे काम या फेशियलच्या माध्यमातून होते. तसेच गुलाबांच्या फुलांपासून बनवलेले
फेशियल तुम्हाला ताजेतवाने जाणवून देईल. अशा नैसर्गिक फेशियलला बाजारात खूप मागणी आहे.

आपली त्वचा कोरडी असल्यास मेरीगोल्ड फेशियल केल्यास चांगले फायदे मिळतील. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होवून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. आपल्याला फक्त त्वचेवर तजेला हवा असेल तर फ्लोरल किंवा फ्लावर फेशियल केल्यास उत्तम तेज बरोबर आगळावेगळा लूक येईल. चेहरा खुलून दिसेल. परंतु १५ दिवसांतून एकदा या प्रकारातील फेशियल करणे आवश्यक आहे. थोड्या दिवसांनी याचे चांगले परिणाम दिसण्यास चालू होतील.

1,023 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा