नायजेरियात चाच्यांकडून ५ भारतीय खलाशांचे अपहरण

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नायजेरियात समुद्री चाच्यांकडून ५ भारतीय खलाशांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्याचबरोबर नायजेरीयातील भारतीय उच्चायुक्तांना या खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माध्यमांतील वृत्तातून मला याची माहिती कळाली. त्यानंतर तत्काळ नायजेरीयातील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. नायजेरीयन सरकारशी चर्चा करुन या पाचही जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा अहवाल तयार करुन आपल्याकडे पाठवण्याचेही आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More