Breaking News

 

 

भारतीय लष्करात लवकरच टी-९० ‘भीष्म’ रणगाडे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय लष्कर लवकरच आपल्या ताफ्यात रशियन बनावटीच्या ४६४ अतिरिक्त टी-९० ‘भीष्म’ रणगाडयांचा समावेश करणार आहे. पाकिस्तानला लागून असणाऱ्या पश्चिम सीमेवर हे रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. या रणगाडयांसाठी भारत १३,४४८ कोटी रुपये खर्च करणार असून २०२२ ते २०२६ दरम्यान हे रणगाडे लष्कराला मिळतील, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानलाही असेच टी-९० रणगाडे हवे आहेत. ३६० टी-९० रणगाडे खरेदी करण्यासंदर्भात पाकिस्तानची रशियाबरोबर चर्चा सुरु आहे. ४६४ टी-९० रणगाडयांच्या उत्पादनासाठी रशियाने मंजुरी दिली आहे. अवादी हेवी व्हेईकल फॅक्टरीला भीष्म रणगाडयांच्या निर्मितीसाठी लवकरच मागणीपत्र मिळेल असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

भारतीय लष्कराकडे टी-९० प्रकारचे १,०७० रणगाडे आहेत. त्याशिवाय १२४ अर्जुन, २४०० टी-७२ रणगाडे आहेत. भारताने २००१ पासून ८,५२५ कोटी रुपये मोजून रशियाकडून ६५७ टी-९० रणगाडे आयात केले आहे. त्यानंतर ‘एचव्हीएफ’ने रशियाकडून परवाना मिळवून भारतातच १ हजार रणगाड्यांचे उत्पादन केले. पहिले ६४ रणगाडे ३० ते ४१ महिन्यात लष्कराला मिळतील असे सूत्रांनी सांगितले.

252 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा