कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे सध्या गाजत असलेल्या मुलगी अपहरण प्रकरणी पोलिसांना अखेर यश आलं आहे. या प्रकरणात बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी अखेर त्या मुस्लिम युवकासह सापडली आहे. ही दोघे कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये सापडले आहेत. या दोघांनाही संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर आता कोल्हापूर पोलीस कर्नाटकात रवाना झाले असून त्यांना परत आणण्याची कारवाई करीत आहेत.

कोल्हापूरतील ही अल्पवयीन मुलगी १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. इयत्ता नववीत असणारी ही मुलगी दिवाळीपूर्वीचा पेपर द्यायला गेली होती, पण परत घरीच आली नाही. यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या मुलीसोबत मुस्लिम युवकही गायब झाल्यामुळे संशय अधिकच बळावला.

या प्रकरणानंतर कोल्हापुरात आंदोलने सुरु झाली होती. यावेळी पोलीसांनी मुलीचे अपरहण करणारा युवकाचा फोटो प्रसिद्ध करत अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी नागरीकांना केलं होतं.