मोदींनी शहीदांच्या नावाने मते मागणे चुकीचे : विक्रम गोखले

पुणे (प्रतिनिधी)  :  मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. मी केवळ जवान आणि शेतक-यांशी बांधील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या नावाने मते मागणे चुकीचे आहे, अशी टीका अभिनेते विक्रम गोखले यांनी केली. ते पुणे येथे बोलत होते. तर दुसरीकडे दुष्काळाचे खापर सत्ताधा-यांवर फोडणे हे देखील चुकीचे असल्याचा टोला विरोधकांना लगावत त्यांनी सरकारची पाठराखण केली. 

विक्रम गोखले म्हणाले,  जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये. तर उष्माघात, दुष्काळ आणि पूर अशा संकटांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार कसे?  प्रत्येक गोष्टींमध्ये सत्ताधाऱ्यांवर खापर फोडणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. 

मलाही तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून अनेकवेळा आग्रह झाला. पण मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र असल्यामुळे मी कोणत्याच पक्षामध्ये दाखल झालो नाही. मात्र, चांगला राजकीय पुढारी होण्यासाठी योग्य अभ्यास असणे गरजेचे असल्याचेही गोखले म्हणाले.  

168 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram