Breaking News

 

 

विश्वचषक क्रिकेट : भारत-पाक सामन्याची तिकिटे संपली !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होत आहे. नेहमीच जगभरातील क्रिकेट शौकिनांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे असते. याही विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना १६ जून रोजी मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार असून या सामन्याची सर्व तिकिटांची विक्री झाली आहे. विक्रीला सुरुवात झाल्याबरोबर दोनच दिवसांत तिकिटे संपली आहेत. विशेष म्हणजे भारत-पाक सामन्याची तिकिटे विकत घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचीच संख्या अधिक आहे. 

आतापर्यंत विश्वचषकात एकदाही पाकिस्तान भारताला हरवू शकलेला नाही. २०१५ मध्ये विश्वचषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी त्यांचे टीव्ही फोडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. पुलवामाच्या घटनेनंतर पाकिस्तानशी विश्वचषकात एकही सामना खेळणार नाही अशा घोषणाही भारतात देण्यात आल्या होत्या. पाकिस्तानला विश्वचषक खेळू देऊ नका अशी मागणीही बीसीसीआयने आयसीसीकडे केली होती. पण अखेर यातून बीसीसीआयने माघार घेत पाकिस्तानशी खेळण्यास होकार दिला होता.  दोन्ही देशांमध्ये इतका तणाव असतानाही सामन्याची सगळी तिकीटं विकली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मॅन्चेस्टरच्या याच मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजमध्ये २६ जूनला सामना रंगणार आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री मात्र खूपच तुरळक प्रमाणात होते आहे.

642 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा