Breaking News

 

 

‘मोदी बॉक्सरने प्रतिस्पर्ध्यांऐवजी आधी कोचलाच मारले…’

चंदिगढ (वृत्तसंस्था) : भाजपने २०१४ साली नरेंद्र मोदी नावाचा बॉक्सर रिंगणात उतरवला होता. त्यांनी प्रतिस्पर्ध्याला मारण्याऐवजी ‘कोच’लाच ‘पंच’ लगावला. यामध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्यांंचा समावेश होता, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते आज (सोमवार) हरियाणामधील भिवानी येथील प्रचारसभेत बोलत होते.

गांधी यांनी म्हटले की, मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने रिंगणात नरेंद्र मोदी नावाचा बॉक्सर उतरवला होता. रिंगणात उतरल्यानंतर हा बॉक्सर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि भ्रष्टाचार अशा समस्यांवर प्रहार करेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, रिंगणात उतरल्यानंतर मोदींनी प्रतिस्पर्धी सोडून सर्वप्रथम त्यांचे प्रशिक्षक लालकृष्ण अडवाणी यांना जोरदार ठोसा लगावला. यानंतर ते स्वत:च्या पथकामधील नितीन गडकरी आणि अरूण जेटली यांच्यामागे धावत सुटले. हे सर्व बघून लोक चक्रावून गेले. मात्र, मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते रिंगणातून बाहेर पडले आणि सामान्य जनतेला मारत सुटले. त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना ठोसा लगावला, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

तसेच नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय लष्करासंदर्भात करण्यात येणाऱ्या राजकारणावर त्यांनी टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी यासाठी भिवानीच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. मी एकवेळ प्राण देईन पण अशा मुद्द्यांवरून राजकारण करणार नाही, असेही राहुल यांनी सांगितले.

390 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे