Breaking News

 

 

पन्हाळगडावरून तब्बल ८२१ ‘शिवज्योती’ रवाना !

पन्हाळा (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यासाठी ऐतिहासिक पन्हाळगडावर गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज (सोमवार) पन्हाळगडावर शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. राज्याच्या विविध शहरातील शिवभक्तांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘छ. शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत शिवज्योत नेली.

गडावर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. जयंतीनिमित्त कोल्हापूर, पुणे,सांगली, सातारा, रायगड, सोलापूर या शहरांसह  कर्नाटक, गोवा, गुजरात येथील शिवभक्तांनी शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी केली होती. तब्बल ८२१ शिवज्योत यावेळी नेण्यात आल्या. पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्यात येत आहेत. याचबरोबर लाईट,पाणी,यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

आज सकाळी १० वा. १०  मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. या वेळी पालकमंत्री चंदकांतदादा पाटील, नगराध्यक्षा रुपाली धडेल, शाहूवाडी – पन्हाळा विभागाचे पोलीसप्रमुख आर. आर. पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास  चव्हाण, पोलिस निरीक्षक ए.बी फडतरे उपस्थित होते. आज सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून पन्हाळ्यातील प्रसिद्ध रुद्रशंभो  ढोल ताशा पथक हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरणार आहे.

1,044 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *