Breaking News

 

 

बारा तास सलग वीज द्या ! : पाणीपुरवठा संस्थांची महावितरणकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरुनही चार ते पाच वर्षे वीज कनेक्शन दिलेले नाही. कृषी पंपांंना अपुरा वीज पुरवठा, कमी दाबाने वीज पुरवठा, खंडीत वीज पुरवठा यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे किमान १२ तास सलग वीजपुरवठा करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पाणी पुरवठा संस्थांच्या सहकारी संघामार्फत महावितरणकडे करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन आज (सोमवार) देण्यात आले.

संघाचे अध्यक्ष विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे, जावेद मोमीन, चंद्रकांत पाटील, आर.के.पाटील, रणजीत जाधव, सखाराम पाटील, कुलकर्णी यांच्या शिष्ट मंडळाने आज महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले, अधिक्षक अभियंता एस.एम. रोठोर, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज काढून कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत. तरीही गेली चार ते पाच वर्षे वीज कनेक्शन दिलेली नाहीत. तसेच वीजेचे खांब व वायर्स याचाही पुरवठा केलेला नाही. उन्हाची तिव्रता वाढत असताना सुरु असलेल्या कृषी पंपावरील वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जातो. दिवसा आठ तासही वीज दिली जात नाही. वीज पुरवठा कमी दाबाने केला जातो. यामुळे शेतकऱ्यांची पीके वाळत असून मोठे नुकसान होत आहे. म्हणून किमान बारा तास सलग वीज पुरवठा व्हावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

याबरोबरच पाटबंधारे खात्याने गरज नसताना लागू केलल्या उपसाबंदीबद्दल या शिष्ट मंडळाने नाराजी व्यक्त करुन उपसाबंदी उठवण्यासाठी पाटबंधारे खात्याकडे व राज्य शासनाकडे पाठपुरवा करणार असल्याचे सांगितले.

489 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश