Breaking News

 

 

जाणून घ्या अक्षय्यतृतीयेचे महत्त्व अन् काय खरेदी करावे ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू परंपरेनुसार साडेतीन मुहूर्त अत्यंत शुभ, महत्त्वाचे मानले जातात. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा हे दिवस पूर्ण मुहूर्ताचे तर दीपावलीत येणारा बलिप्रतिपदा (पाडवा) हा अर्धा मुहूर्ताचा दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी दिनशुद्धी पाहण्याची गरज नाही. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्यतृतीया हा सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा आहे. उद्या (मंगळवार) अक्षय्यतृतीया साजरी होत आहे. त्यानिमित्त…

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. विशेष म्हणजे या दिवशी सोन्याची खरेदी करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते. देवांचा खजिनदार किंवा संपत्तीचा देव म्हणजे कुबेर,  त्याने शंकराची उपासना करून संपत्ती याच दिवशी मिळवली अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवसाला संपत्तीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व हिंदू धर्मात आहे. संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ आहे, ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असं. या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं, जेणेकरून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील.

भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचा याच दिवशी जन्म झाल्याचं मानण्यात येतं. भगवान विष्णू व त्याची पत्नी लक्ष्मी यांची पूजा केली तर सुख, समृद्धी येते, भरभराट होते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. सोने खरेदी करण्याशिवाय नवीन उपक्रम, उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदूंमध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानण्यात येतो. ‘महाभारत’ हे महाकाव्य लिहिण्यास वेद व्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरूवात केली होती अशी मान्यता आहे. तसेच तीर्थंकर भगवान ऋषभनाथांचा सहा महिन्यांचा उपवास आज संपला म्हणून जैन धर्माचे लोक आजचा दिवस साजरा करतात.  त्यामुळे सोनं खरेदी करत जैन धर्मीय अक्षय्यतृतीया साजरी करतात.  हिंदू व जैन दोन्ही पुराणकथांमध्ये अक्षय्यतृतीयेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

या दिवशी घर, सोने, वाहन, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू खरेदी करावे. संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. या दिवशी केवळ राहू काळाचा कालावधी वगळता खरेदी करण्यास कोणतीच हरकत नाही. मंगळवारी राहू काळ दुपारी ३. ४१ ते सायंकाळी ५. १८ पर्यंत आहे. त्यामुळे हा सुमारे दीड तासांचा कालावधी वगळता इतर वेळी खरेदी करावी, अशी माहिती ज्योतिषविशारद सौ. श्रद्धा राठोड यांनी दिली आहे.

1,980 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा