हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन मास्टर-ब्लास्टर ‘बीसीसीआय’वर भडकला !

मुंबई (वृत्तसंस्था) : हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या लोकपालांनी सचिन तेंडुलकरला नोटीस बजावली होती. त्यावर सचिनने बीसीसीआयला योग्य शब्दांमध्ये उत्तरही दिले होते. मात्र ह्या सर्व वादात मास्टर-ब्लास्टरचा संयम संपला. यामुळेच त्याने बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी.के.जैन यांना १३ मुद्दे असलेले खरमरीत पत्रच लिहिले आहे.

सचिनने लिहिलेल्या पत्रामध्ये सध्या क्रिकेटमध्ये जो काही हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित केला जातोय या परिस्थितीला बीसीसीआयलाच जबाबदार धरण्यात आले आहे. या पत्रात त्याने मांडलेल्या काही मुद्द्यांनी तर थेट बीसीसीआयलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

आपण २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे आयकॉन बनलो होतो. त्यानंतर २०१५ मध्ये बीसीसीआयनंच आपल्याला प्रशासकीय समितीचा सदस्य बनवले. प्रशासकीय समितीच्या सदस्य असलेल्या आपल्या भूमिकेबाबत आपण अनेकदा बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितले. मात्र आजपर्यंत त्याचं काहीही उत्तर मिळालं नाही. बीसीसीआयला याची पूर्ण कल्पना आहे की प्रशासकीय समिती केवळ सल्लागाराची भूमिका बजावू शकते. अशावेळी मुंबईचा आयकॉन असणे यामध्ये कोणताही हितसंबंधांचा मुद्दा आड येत नाही. अशा कडक शब्दात सचिनने बीसीसीआयची कान उघाडणी केली.

आता बीसीसीआय सचिनच्या या प्रतिक्रियेवर काय भूमिका घेणार ?  याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. याखेरीज जवळपास २४ वर्ष क्रिकेटची निष्ठेने सेवा केल्यावरही अशाप्रकारे जाब विचारला जात असेल तर ते त्याच्या चाहत्यांनाही अजिबातच पटणार नाही. 

468 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram