गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील निलजी येथील हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्थेने ‘गोडसाखर’च्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा दिला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून हा पाठिंबा जाहीर केला.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर, ॲड. विकासराव पाटील, उदयराव जोशी, सोमगोंडा आरबोळे, आर. एस. पाटील, वरदशंकर वरदापगोळ, विकास पाटील, हणमंतराव पाटील, सुभाष कोरी, महादेव मोर्ती, भीमा धुमाज, तुकाराम शिंदे, बसवराज ककणवाडी, बभिशूल पाटील, रघुनाथ पाटील, सातगोंडा जिन्नानावर, मुन्ना बेडक्याळे आदी प्रमुख उपस्थित होते.