Breaking News

 

 

खेळाडूंना सकस आहाराची जोड हवी : डॉ. मंगल मोरबाळे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  खेळाडू आपली कामगिरी उंचावण्यासाठी जीवतोड सराव करतात. त्याला सकस आहाराची जोड हवी. सरावा इतकाच आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांनी आहाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी व्यक्त केले. त्या खेळाडू आणि आहार या व्याख्यानात बोलत होत्या. एम.आर.हायस्कूल मैदानावर हा कार्यक्रम झाला.

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. फुटबॉल प्रशिक्षक दीपक कुपनावर यांनी अत्याधुनिक क्रिडा शास्त्रात आहाराचे महत्त्व वाढल्याचे सांगितले. यावेळी एका चित्रफितीद्वारे  आहाराचे महत्व खेळाडूंना सांगण्यात आले.

यावेळी  डॉ. मोरबाळे म्हणाल्या, खेळाडूंनी पालेभाज्या, कडधान्ये, फळे यावर अधिक भर दिला पाहिजे. पालकांनी बालपणापासूनच नवोदित खेळाडूंना फास्ट फुडपासून दुर ठेवायला हवे. आहारावरच खेळाडूंची शारिरीक वाढ अवलंबून असते. सामना अथवा दैनंदिन सरावासाठी खेळाडूंना खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्याची भरपाई सकस आहारने करायला हवी. भरपूर नाष्टा, दुपारचे अधिक जेवण तर रात्री हलका आहार हवा. सरावानंतर अधिक पिकलेली फळे खाणे उपयुक्त ठरतात, असे डॉ. मोरबाळे यांनी सांगितले. यावेळी महिला पालकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. मोरबाळे यांनी दिली.

1,803 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा