गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा येथे शाखा स्थापन करण्यासंदर्भातील ग्राहक पंचायत महाराष्ट्रची बैठक येथील भक्तनिवासमध्ये उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी निवृत्त गटशिक्षणाधिकारी ए. बी.पाटील होते.

ग्राहक पंचायतचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी संस्थेचा उद्देश, इतिहास, व ग्राहकांच्या तक्रारी, झालेली फसवणूक, न्याय कसा मिळाला. याबाबत अनेक उदाहरणे सांगितली. ‘तुम्ही गिर्‍हाईक बनू नका तर सजग ग्राहक बना’ असेही ते म्हणाले. निवृत शिक्षणाधिकारी ए. बी. पाटील यांनी ग्राहकास कसे फसविले जाते. याचे अनेक किस्से सांगितले. गगनबावडा तालुक्यातील ४६ वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेल्या गावांमध्ये ही चळवळ जोमाने पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील बैठकीत कार्यकारिणीची घोषणा होणार आहे.

या बैठकीसाठी पंचायतचे जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील, सचिव दादासो शेलार, गगनबावड्याच्या सरपंच मानसी कांबळे, सांगशीचे सरपंच भास्कर माने, कार्यकर्ते विलास पाटील, गुरुनाथ कांबळे, सदस्य राजेंद्र कांबळे, एस. एन. पाटील, एस आर भांबुरे, ए. एस. नागावकर, नीलेश गाड, तानाजी पाटील, तुकाराम पडवळ व ग्रामस्थ उपस्थित होते.