Breaking News

 

 

बॉलीवूड कलाकारांचा मोदींना जाहीर पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : विवेक ओबेरॉय, कंगना रणौत, पुनम ढिल्लो, गजेंद्र चौहान आणि कुस्तीपटू द ग्रेट खली या कलाकारांनी आज (रविवार) दिल्लीतील भाजपा कार्यालयास भेट दिली. यावेळी सर्व कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेत जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या.

देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे.  देशात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. याआधी कलाविश्वातील जवळपास ९०० कलाकारांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दर्शविला होता. तर काही कलाकारांनी मोदींना विरोध दर्शवला होता. त्यामुळे कलाविश्वामध्ये मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन गट तयार झाल्याचे पहायला मिळत आहे.

आज (रविवार) भाजपाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपाने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या ‘सेलिब्रिटी विथ मोदी’ या कार्यक्रमात  विवेक ओबेरॉय, कंगना रणौत, बोनी कपूर, मालिनी अवस्थी, पुनम ढिल्लो, प्रल्हाद कक्कर, गजेंद्र चौहान, मनोज जोशी यासारख्या दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहत आपला पाठिंबा नोंदवला आहे.

231 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा