धुमडेवाडी येथे वारकरी किर्तन संमेलनाचे आयोजन : सुनील शिंत्रे

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन शुक्रवार (दि. १७) रोजी करण्यात आले आहे. गडहिंग्लज विभागातील हे पहिले संमेलन असल्याची माहिती संमेलनाचे स्वागतध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली.

सुनील शिंत्रे म्हणाले, गडहिंग्लज विभागात वारकरी मंडळींची संख्या लक्ष्यणीय आहे. त्यांना अशा प्रभोधनपर किर्तन संमेलनाची गरज आहे. त्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे. पंढरपूरला अनेक वारकरी भक्तिभावाने जातात. त्यावेळी भौतिक समस्यांचा विचार वारकरी मंडळी कधीच करत नाहीत. वारकऱ्यांच्या समस्या भरपूर आहेत. पण त्या व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी परीसंवादाचे आयोजन करून महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांना निमंत्रित केले आहे. तरी या सोहळ्याला समस्त वारकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील शित्रे यांनी यावेळी केले.

1,590 total views, 3 views today

3 thoughts on “धुमडेवाडी येथे वारकरी किर्तन संमेलनाचे आयोजन : सुनील शिंत्रे”

  1. एक उत्कृष्ठ समाजोपयोगी उपक्रम. धन्यवाद शिंत्रे सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram