Breaking News

 

 

मोदीजी तुमची लढाई आता संपली : राहुल गांधीचे ट्विट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) ट्विटरमार्फत प्रतिक्रिया दिली आहे. तुमची लढाई आता संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असेही ते म्हणाले.

मोदींनी काल प्रतापगड आणि बस्ती येथील जाहीरसभांमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती की, तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या राजदरबाऱ्यांनी मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर भ्रष्टाचारी नंबर १ अशी झाली. हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यावर राहुल गांधी यांनी मोदींचा ट्विट करीत मोदींवर हल्ला चढवला. 

396 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *