Breaking News

 

 

पत्नीच्या खून प्रकरणी वृद्धास सात वर्षांचा कारावास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  किरकोळ कारणातून पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याप्रकरणी वृद्धास जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे कारावास आणि रु. ३०००/- दंड अशी सजा सुनावली. आनंदा सत्तू उलसार (वय ६९, रा. बौध्द समाज मंदिरानजीक, हर्ले, ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव असून जिल्हा व सत्र न्यायाधीश – ४ आर.एस.निंबाळकर यांनी आज (शनिवार) हा निकाल दिला.

आनंदा उलसार हा पत्नी सखूबाई, मुलगा, सून आणि नातू यांच्यासह हेर्ले येथे राहतो. तो नेहमी पत्नीवर चारित्र्याविषयी शंका घेवून त्रास देत असे. मुलगा, सून आणि नातू बाहेरगावी गेले असताना ११ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे आनंदा उरसाल याने पत्नीकडे चहा मागितला. यावेळी त्याला चहा न देता सखूबाईने काठीने मारण्यास सुरुवात केले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने सखूबाईवर डोक्यात आणि जबड्यावर कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर स्वतः हातकणंगले पोलीस ठाण्यात जावून गुन्ह्याची कबूली दिली होती.

परिस्थितीजन्य पुराव्यावरुन आणि सरकारी वकील एन.बी.आयरेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून उलसार याला कलम ३०४ अन्वये सात वर्षांचा कारावास आणि ३००० /- रुपये दंड अशी सजा सुनावली.

288 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे