Breaking News

 

 

चारु चांदणेस बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात गाजलेल्या दर्शन शहा खून प्रकरणी जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या योगेश उर्फ चारु चांदणे यास लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. ए.यु.कदम यांनी आज (शनिवार) या प्रकरणी निकाल दिला आहे.

देवकर पाणंद परिसरात राहणाऱ्या लहान मुलावर चारु चांदणे याने तीन ते चार वेळा लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चांदणे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी सहा साक्षिदार आणि पिडीत मुलाची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने चांदणे यास भा.दं.वि.स. कलम ३७७, ५०६, २९३ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ३ ते ६ अन्वये जन्मठेप, रु. ५,०००/- दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची कैद अशी सजा ठोठावली आहे.

याकामी स.पो.नि. आय.एस. सोनकांबळे, कॉ. कृष्णात बेडगे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. सरकारतर्फे अॅड. सौ. सुजाता इंगळे यांनी काम पाहिले.

456 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग