बोरपाडळे (प्रतिनिधी) : जीवनात यश संपादन करण्यासाठी कठीण परिश्रमाची गरज असते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कष्ट करण्याची तयारी ठेवावी. आपण स्वतः शिकून आपल्याला आई-वडिलांच्या नाव मोठे करण्याची जिद्द असायला हवी. आपल्या जीवनात आई-वडिलांचा आशीर्वाद हाच गुरुमंत्र आहे, असे प्रतिपादन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी दिला.

ते बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे पन्हाळा-शाहूवाडी तालुका कुंभार समाज संघ यांच्या वतीने दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कारप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पन्हाळा बावडा कुंभार संघाचे अध्यक्ष रामचंद्र कुंभार होते. प्रास्ताविक विष्णू कुंभार यांनी, तर सूत्रसंचालन राजाराम कुंभार यांनी केले. भगवान कुंभार यांनी आभार मानले. यावेळी विक्रम कुंभार, सागर कुंभार, सल्लागार एम. व्ही. कुंभार, गोविंद कुंभार, आनंदा कुंभार, अधिनाथ कुंभार, एस. एस. कांबळे, श्रीकांत कुंभार आदी उपस्थित होते.