गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आ. मुश्रीफांनी कारखाना दोन वर्षे अगोदर सोडण्याचे षडयंत्र रचले असा आरोप ‘गोडसाखर’चे माजी चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी केला. श्री काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आ. हसन मुश्रीफ यांनी कारखाना सोडला आणि तो चालू होऊ नये यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यास नकार दिला. हे सर्व ते कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत होते, असेही ते म्हणाले.

यावेळी संग्रामसिंह नलवडे, शिवाजीराव खोत, आ. राजेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेस सुरेश कुराडे, रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, बाळेश नाईक यांच्यासह श्री काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. अमर चव्हाण यांनी आभार मानले.