Breaking News

 

 

मेहबूबांंना दहशतवाद्याचा पुळका ! म्हणे, ‘रमजान’मध्ये कारवाया नको…

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना दहशतवाद्यांचा भलताच पुळका आला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाया थांबवण्यात याव्यात अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. त्यांनी आज (शनिवार) एका पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला याबाबत आवाहन केले.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, रमजान जवळ येत आहे. या काळात मुस्लीम नागरिक दिवस – रात्र प्रार्थना करत असतात, मशिदीत जात असतात. त्यामुळे गेल्या वर्षी जसे रमजानमध्ये केंद्र सरकारने शस्त्रसंधीला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणेच यंदाही केंद्र सरकारने रमजानच्या काळात दहशतवाद्यांविरोधातील कारवाया, शोध मोहिम बंद कराव्यात. जेणेकरून जम्मू कश्मीरच्या लोकांना एक महिना तरी शांतता मिळेल’, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना देखील रमजानच्या काळात हल्ले करू नका असे आवाहन केले असल्याची माहिती मिळाली आहे.

375 total views, 3 views today

One thought on “मेहबूबांंना दहशतवाद्याचा पुळका ! म्हणे, ‘रमजान’मध्ये कारवाया नको…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग