Breaking News

 

 

फेसबुक मैत्रिणीला भेटण्यास आलेला दुचाकी चोरटा निघाला !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी तो थेट वर्ध्याहून कोल्हापुरात आला आणि त्याच महिलेशी सलगी वाढवत आपला दुचाकी चोरण्याचा व्यवसायही कोल्हापुरात सुरू केला. पण दुचाकी चोरताना कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. सोमेश्वर साहेबराव आत्राम (वय २७, रा. सिरकुटणी, ता. आष्टी, जि. वर्धा) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून शाहूपुरी पोलिसांनी ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

शाहुपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमेश्वर आत्राम मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दुचाकी गाड्यांशी छेडछाड करताना तपास पथकाच्या पोलिसांना दिसून आला. त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. वळिवडे रेल्वे फाटकानजीक झोपडपट्टीत राहून लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शिरोली एमआयडीसी परिसरातील मोटारसायकल चोरल्याचे सोमेश्वर याने कबूल केला आहे. या मोटारसायकलींची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे किंमत १, १०, ००० इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमेश्वर हा वर्धा जिल्ह्यात चोर्‍याच करत असावा. पोलिसांना गुंगारा देऊन इतर जिल्ह्यात चोर्‍या करीत कोल्हापूरात आला असण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात मात्र तो फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी आला व दररोजचा खर्च भागवण्यासाठी गाड्या चोरण्याचा उद्योग सुरु केला. त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास शाहुपूरी पोलीस करत आहेत. या करवाईमध्ये पो. नि. संजय मोरे, स. पो. नि.शहाजी निकम, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, राजू वारके, हवालदार दिनकर होवाळे, युवराज पाटील, प्रशांत घोलप यांचा समावेश होता

1,407 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग