Breaking News

 

 

कोणत्याही दुचाकीचे अॅव्हरेज वाढवून देण्याची सुविधा उपलब्ध : सुभाष चौगुले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोणत्याही कंपनीच्या दुचाकीचे अॅव्हरेज १० ते ५० किमी. पर्यंत वाढवून दिले जाईल. या सुविधेमुळे वाहनधारकांना पेट्रोलची बचत करणे सोयीचे होईल, असा दावा कोल्हापूर-सांगली मार्गावरील चोकाक येथील सुपर अॅव्हरेज अॅटोचे सुभाष चौगुले यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केला. या सोयीचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चौगुले यांनी सांगितले की, चोकाक येथे आपले सुपर अॅव्हरेज अॅटो नावाचे गॅरेज आहे. सध्या अनेक दुचाकी बाजारात आल्या आहेत. पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. बाजारात नव्याने दाखल झालेल्या अनेक दुचाकींना विशेषतः मोपेडना अॅव्हरेज चांगले मिळत नाही. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोलवर जादा खर्च करावा लागतो. या खर्चात बचत व्हावी, या दृष्टीने मी एक नव तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यानुसार कोणत्याही कंपनीच्या दुचाकीचे अॅव्हरेज कंपनीने प्रमाणित केल्यापेक्षा सुमारे १० ते ५० कि.मी पर्यंत वाढवून दिले जाते. त्यामुळे पेट्रोल खर्चात बचत होईल. यामध्ये कार्बोरेटर जेट बदलावा लागत नाही. पिकअप दुप्पटने मिळेल तसेच इंजिनचा आवाज ५० टक्क्यांंपेक्षा कमी होतो. रस्त्यावर २२ ते २५ स्पीडने टॉप गिअरवर गाडी चालवता येणार आहे. यामुळे वारंवार गिअर बदलावे लागत नाही. यामध्ये वाहनधारकाच्या मागणीनुसार अॅव्हरेज काढून दिले जाते. तसेच बुलेटसारख्या अनेक गाड्यांच्या कंपनीचे स्ट्रोक, पिकअप वाढवून दिला जातो.

वाहनधारकांना सकाळी ८.०० ते रात्री ९ या वेळेत वाहनधारकांना सेवा पुरवली जाते. आतापर्यंत  त्यांनी बोरगांव, सदलगा, रायबाग, पट्टणकोडोली, साजणी, रुई या गावांमधील वाहनधारकांना ही सेवा पुरवली आहे. वाहनधारकांकडून प्रत्येकी ५०० रु. घेउन त्यांना सध्या ५ वर्षे सेवा पुरवली जाते, असेही त्यांनी सांगितले.

3,335 total views, 12 views today

One thought on “कोणत्याही दुचाकीचे अॅव्हरेज वाढवून देण्याची सुविधा उपलब्ध : सुभाष चौगुले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा