Breaking News

 

 

गीतकार जावेद अख्तर यांना घरात घुसून मारण्याची धमकी !

मुंबई (प्रतिनिधी) : विख्यात गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांना नेहमी वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते बऱ्याचदा सामाजिक संघटनांच्या निशाण्यावर असतात. इस्टर संडे दिवशी श्रीलंकेत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली ज्यामध्ये तीनशेवर नागरिकांचा बळी गेला. यावर प्रतिक्रिया देताना अख्तर यांनी भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बुरखा आणि घुंगट दोन्हीवर बंदी घालावी असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे करणी सेना खवळली असून घुंगटबाबत केलेल्या वक्तव्याबाबत अख्तर यांनी तीन दिवसांत माफी न मागितल्यास त्यांना घरात घुसून मारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुरख्यावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत भोपाळमधील एका कार्यक्रमात अख्तर म्हणाले की,’श्रीलंकेत बुरख्यावर नाही तर चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर भारतात अशा प्रकारे बुरख्यावर बंदी घालण्यात आली तर केंद्र सरकारनं राजस्थानात मतदान होण्याआधी घुंगटवरही बंदी घालावी.  बुरखा आणि घुंगट दोन्ही राहीले नाही तर मला आनंद वाटेल. त्यांच्या या वक्तव्यानं करणी सेना  मात्र भडकलेली आहे.

करणी सेनेचे प्रमुख जीवनसिंह सोलंकी यांनी अख्तर यांच्याविरोधात एक व्हिडिओ शेअर करत त्यांना धमकी दिली आहे. करणी सेनेचा हा ४५सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात सोलंकी यांनी म्हटलंय की, जावेद यांना आपल्या मर्यादा समजायला हव्या. राजस्थानसारख्या राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नये. अशा लोकांना करणी सेना चांगलंच ओळखते. भन्साळीसाहेबांना एकदा विचारा की अशा लोकांना करणी सेना कशा प्रकारे उत्तर देते. जर राजस्थानच्या संस्कृतीवर कोणी शंका उपस्थित केली तर करणी सेना त्या व्यक्तीचे डोळे काढून हातात देण्याची हिंमत ठेवते. जर जावेद अख्तर यांनी तीन दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर करणी सेना त्यांना घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही.

798 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग