Breaking News

 

 

उशिराचं शहाणपण ! : पाकिस्तान सरकारकडून मसूदचे संपत्ती गोठविण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानलाही उशिरा शहाणपण सुचले आहे. पाकिस्तान सरकारने  मसूद अजहरची संपत्ती गोठवण्याचे अधिकृत आदेश आज (शुक्रवार) जारी केले. त्याच्या प्रवासावरही निर्बंध घालण्यात आल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.  मसूद अजहरला शस्त्रास्त्रांचे व्यवहार करण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. 

भारताच्या दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. यानंतर साहजिकच मसूद अजहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून आता मसूद अजहरभोवतीचा फास आवळायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पाकच्या सुरक्षा आणि विनिमय आयोगाकडून (एसईसीपी) देशातील सर्व बिगरबँकिंग आर्थिक संस्था आणि नियामक यंत्रणांना मसूद अजहरची गुंतवणूक गोठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मसूद अजरवर काय कारवाई केली, यासंबंधीचा अहवालही तीन दिवसांच्या आतमध्ये सादर करण्याचे आदेश ‘एसईसीपी’ने दिले आहेत. हा निर्णय म्हणजे भारताच्या कूटनीतीचा मोठा विजय असल्याचे मानले जाते.

525 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash