Breaking News

 

 

गुड न्यूज : ‘आधार’मधील पत्ताबदल प्रक्रिया अधिकच सोपी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधारकार्डच्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी अनेकदा आधार केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत होते. तसेच यासाठी निवासी पत्ता असणे गरजेचे होते. परंतु सरकारने या प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार, अर्जदाराला निवासी पत्ता बदलण्याकरिता कोणत्याही प्रकारचा पुरावा देण्याची गरज भासणार नाही. ऑनलाईन प्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदाराला वेळदेखील वाचवता येणार आहे. मात्र, यासाठी अर्जदाराला ‘यूआयडीएआय’कडून पत्ता प्रमाणीकरण पत्र मिळवावे लागणार आहे.  यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

आधारकार्ड खाते उघडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड हे आवश्यक आहे.  परंतु अनेकदा आधारकार्डमध्ये चुकीचा तपशील असल्यामुळे संबधित व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.  स्थलांतरित झालेल्या लोकांना आधारकार्डमधील पत्ता बदलण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. याकरिता पत्त्याशी निगडित पुरावा देणे गरजेचे होते.

यूआयडीएआय वेबसाइटच्या मते, पत्त्यामध्ये बदल करण्याआधी आपला मोबाइल नंबर आधार नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे. जर मोबाइल नंबर आधारशी नोंदणीकृत नसेल तर लॉग इन करता येणार नाही.  ज्या रहिवाशांजवळ पत्ता संबधित पुरावा नाही त्यांना यूआयडीएआयने पाठवलेल्या पत्त्याचे ओळखपत्र वापरून त्यांच्या पत्त्यावर बदल करता येणार आहे. केवळ पत्ता प्रमाणीकरण पत्र  मिळवण्याकरीता निवासी पत्ताधारकाकडून संमती मिळवणे आवश्यक आहे.

1,986 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा