Breaking News

 

 

ओडिशाच्या किनारपट्टीला ‘फॅॅनी’चा तडाखा : तिघांचा मृत्यू, प्रचंड वित्तहानी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या किनारपट्टीला आज (शुक्रवार) सकाळी धडकलेल्या
‘फॅनी’ चक्रीवादळाने चांगलेच झोडपून काढले. वादळाच्या या तडाख्यात ३ जण ठार तर १ जखमी झाल्याचे वृत्त आहे. या वादळाने मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. सध्या हे वादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवर वादळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धडकले. त्या वेळी वारे १७५ ते २०० किमी प्रतितास या वेगाने वाहात होते. वादळामुळे ओडिशात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. आता हे वादळ हळूहळू उत्तर आणि वायव्येच्या दिशेला सरकायला लागलंय. वायव्येकडे सरकताना या वादळाचा वेग मंदावण्याची चिन्हं आहेत. फॅनी चक्रीवादळाचा व्यास तब्बल ५० किलोमीटरचा आहे असं पॅरादिपच्या रडारवरून समजलंय. त्यामुळे फॅनीचा प्रभाव मोठ्या कालावधीत असणार आहे. वादळाआधीच किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता.

वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सुरक्षेच्या कारणास्तव ओडिशाच्या किनाऱ्यावरून ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तसेच एनडीआरएफचे ५ हजार जवान तैनात करण्यात आलेत. फॅनी वादळामुळे रेल्वे, विमानसेवा विस्कळीत झालीय. तटरक्षक दलाने विशाखापट्टणम, चेन्नई, पॅराद्वीप, गोपालपूर, हल्दीया, फ्रेजरगंज, कोलकाता या शहरांमध्ये कोणत्याही आपत्तीशी झुंज देण्य़ासाठी ३४ कक्ष सुरू ठेवले आहेत.  

1,068 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा