कच्च्या मालातील प्रचंड दरवाढीमुळे पशुखाद्याच्या किमतीत वाढ : ‘गोकुळ’चे स्पष्टीकरण

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कच्‍च्‍या मालाच्‍या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे ‘गोकुळ’ संघाला महालक्ष्मी पशुखाद्याच्‍या किमतीमध्‍ये वाढ करावी लागली, असे स्पष्ट करीत केवळ राजकारणातूनच संघावर आरोप होत आहेत. दूध उत्‍पादकांनी वस्‍तुस्थिती समजून घेऊन संघास सहकार्य करावे, असे आवाहन संघाने आज (शुक्रवार) पत्रकाद्वारे केले आहे. तसेच विनाकारण राजकारणाचा मुद्दा बनवून चांगल्या प्रकारे चालविल्या जाणाऱ्या संघाला टार्गेट करून नये. शिवसेनेचे दोन संचालक संघामध्ये कार्यरत आहेत, हे लक्षात घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्यापूर्वी प्रथम त्यांच्याशी चर्चा करून माहिती घ्यावी, असाही टोला लगावण्यात आला आहे.

संघाने पत्रकात म्हटले आहे की, अपुरा पाऊस. किडीचा प्रादुर्भाव,  हमीभाव व आयात बंदीमुळे मक्‍क्याच्‍या दरामध्‍ये गतवर्षाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के प्रचंड वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्‍यात कमी पाऊस, वादळ, गारपीट यामुळे सरकीचे उत्‍पादन घटले असून, सरकी पेंडच्‍या दरात ५० टक्‍क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, छत्‍तीसगड येथे भात उत्‍पादन कमी झाल्‍याने मिलींग कमी झाले आहे. त्‍यामुळे राईस पॉलिश आणि डीओआरबीच्‍या दरात २५ ते ३० टक्‍के वाढ झाली आहे. मो‍लॅसिसच्‍या दरात ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

गतवर्षीच्‍या तुलनेत प्रतिटन वीज खर्चामध्‍ये १४.६७ % तर वाहतुक खर्चामध्‍ये प्रतिटन ७.३२ % वाढ झाली आहे. वरील सर्व कारणांमुळे संघाला नाइलाजाने ३ वर्षानंतर ही दरवाढ करावी लागली आहे. इतर दूध संघानी, खाजगी कंपन्‍यांनी गेल्‍या ३ वर्षामध्‍ये दोन ते तीन वेळा पशुखाद्याची दरवाढ केली आहे.  ‘गोकुळ’च्या पशुखाद्यामध्‍ये सर्वांत महत्त्वाचा जो प्रोटीनचा घटक असतो त्‍याचे प्रमाण आणि प्रतिकिलो पशुखाद्याचे दर पाहता गोकुळच्‍या पशुखाद्याचे दर अन्‍य कंपन्‍यांच्‍या तुलनेत कमी आहेत. काही कंपन्‍यांच्‍या उत्‍पादनामध्‍ये तर प्रोटीनचे प्रमाण कमी आहे, परंतु प्रतिकिलो दर जास्‍त आहे.

प्रचंड स्‍पर्धा वाढली असताना केवळ कोल्‍हापूरच्‍या दूध उत्‍पादकांच्‍या पाठींब्‍याच्‍या जोरावर गोकुळ आपली गुणवत्‍ता टिकवून आहे. कुणीही उठावं आणि राजकरणाचा मुद्दा करत गोकुळला टार्गेट करावं ही वृत्‍ती बरोबर नाही. शिवसेनेच्‍या पदाधिका-यांनीही आंदोलन करण्‍याआधी त्‍यांच्‍या पक्षाचे दोन संचालक गोकुळमध्‍ये आहेत. त्‍यांच्‍याशी या विषयावर चर्चा करुन माहिती घ्‍यावी, असेही म्हटले आहे.

639 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram