Breaking News

 

 

काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : जवान जखमी

श्रीनगर (वृत्तसंस्था) : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच आहे. शोपियान भागात आज (शुक्रवार) सैन्य दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या चकमक थांबली असली तरी शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.  

आज सकाळीच शोपियानमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. काही तास सुरू असलेल्ल्या या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या तिघांपैकी दोघांची ओळख पटली असून लतीफ टायगर आणि तारीक अशी दोघांची नावे आहेत. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठी हस्तगत करण्यात आला आहे. एक जवान जखमी झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा आणि रेल्वे सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

249 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे