Breaking News

 

 

आर. के. स्टुडिओ आता लवकरच इतिहासजमा : आघाडीच्या उद्योगसमूहाने केली खरेदी

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला शोमन मानले गेलेले ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते कै. राज कपूर यांनी उभारलेला चेंबूर येथील आर. के. स्टुडिओ आता इतिहासजमा होणार आहे. हा स्टुडिओ ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला असून येथे आलिशान रहिवासी संकुल उभारण्यात येणार आहे. आज (शुक्रवार) ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने याबाबतची घोषणा केली आहे.

सुमारे ७० वर्षांहून अधिक काळ मुंबईतील चेंबूर येथे २.२ एकर क्षेत्रात पसरलेला हा आर. के. स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने विकत घेतला आहे. या स्टुडिओच्या विक्रीची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत होते. या स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत,’ अशी माहिती ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ कंपनीने दिली.

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबासाठी चेंबूरमधील ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. या जागेवर आता नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी आहे. त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा,  मुलं रणधीर, ऋषी, राजीव, मुलगी रितू नंदा, रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला. स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबंधित प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

825 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे