‘सीबीएसई’ बारावीच्या निकालात मुलीच अव्वल..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईतर्फे आज (गुरुवार) १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाचा निकाल यंदा ८३.४० टक्के लागला असून यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनींनी प्रत्येकी ४९९ इतके गुण प्राप्त करीत अव्वल स्थान पटकावले आहे, सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत यंदा १२ लाख ८७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. यात ७,४८, ४९८ विद्यार्थ्यांचा तर ५, ३८, ८६१ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षी ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या वेळी सीबीएसईचे निकाल १० मेपर्यंत प्रसिद्ध केले जातील असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र सीबीएसईने १ कोटी ७० लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले आहे. या उत्तरपत्रिका एकूण ३ हजार तपासणी केंद्रांवर तपासल्या गेल्या. एक शिक्षक दिवसाला जवळजवळ २५ उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण करतो. या वेळी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

147 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram